शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर चोरणारी सराईत टोळी जेरबंद

बाबाजी पवळे पुणे,अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात शेतकर्‍यांचे ट्रॅक्टर, स्कॉर्पीओ आणि पिकअपसह विविध गाड्यांची चोरी करणार्‍या चार सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या पोलिसांनी अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून १० ट्रॅक्टर सह ७७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सतीश अशोक राक्षे ( रा. बेलवंडीफाटा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर, सध्या रा. राजमाता बिल्डींग, बाबुरावनगर, ता. शिरूर ), ज्ञानदेव उर्फ माऊली विनायक नाचबोणे (रा. रम्यनगरी कॉलनी, धनु झेंडे यांचे बिल्डींगमध्ये, ता. शिरूर, मुळ रा. जयनगर, ता. औसा, जि. लातूर), प्रविण कैलास कोरडे (मुळ रा. बोरी, ता. जुन्नर, जि. पुणे, सध्या रा. राजमाता बिल्डींग, बाबुरावनगर, ता. शिरूर) आणि सुनिल उर्फ भाऊ बिभीषण देवकाते (रा. इरले, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार , सतीश अशोक राक्षे याला  शिरूर येथील राहत्या घरातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता, राक्षे आणि त्याचे तीन साथीदार ज्ञानदेव उर्फ माऊली विनायक नाचबोणे, प्रविण कैलास कोरडे, आणि सुनिल उर्फ भाऊ बिभीषण देवकाते यांनी मिळून २८ ठिकाणी चोर्‍या केल्या असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्यांच्याकडून १० ट्रॅक्टर, २ पिकअप, १ बोलेरो जिप, १ स्कॉर्पीओ, ६ मोटार सायकल, ऑक्सीजन सिलेंडर, घरगुती गॅस सिलेंडर, गॅस कटर, ५ गायी,  पान्हे असा एकूण ७६ लाख ८८ हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Previous articleअहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात शेतकर्‍यांचे ट्रॅक्टर, स्कॉर्पीओ आणि पिकअपसह विविध गाड्यांची चोरी करणार्‍या चार चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या पोलिसांनी अटक
Next articleकोविड केअर सेंंटर मध्ये वृक्षारोपण