दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

दिनेश पवार,दौंड

दौंड विधानसभा मतदार संघातील शेतकरी संपत शिंदे, रमेश कुदळे, मारुती गावडे, शिवाजी पवार यांनी (दि.२३) रोजी  चौफुला येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख महेशदादा पासलकर यांच्या उपस्थितीत शिवबंधन बाधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी माउली आहेर , शंकरराव शितोळे, प्रशांतभाऊ जगताप , विभागप्रमुख हनुमंत निगडे इतर पदाधिकारी उपस्थित होते .
यावेळी जिल्हाप्रमुख महेशदादा पासलकर म्हणाले की, शिवसेनेत काही दिवसापूर्वी रयत क्रांती पक्षाचे जिल्हा युवा अध्यक्ष, माउली आहेर यांनी समर्थकासह पक्ष प्रवेश केल्याने तालुक्यातील शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते शिवसेनेत येण्यास इच्छुक असून, रोज नव्या दमाचे कार्यकर्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहेत.
शिवसेना पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी एक वर्षापुर्वी राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी केली होती त्या अनुशंगाने दौंड तालुक्यांतील शेतक-यांची अंदाजे ४०० कोटी रूपयांची कर्जमाफी झालेली आहे महाविकास आघाडी सरकार च्या माध्यमातून शेतकरी हिताचे होत असलेल्या निर्णयांमुळे शेतकरी कार्यकर्त्यांचा शिवसेनेकडे कल वाढत आहे
Previous articleकुरकुंडी येथील वृध्द महिलेची हत्या करून अत्याचार करणाऱ्या नराधमाला चाकण पोलीसांनी बेड्या ठोकल्या
Next articleअहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात शेतकर्‍यांचे ट्रॅक्टर, स्कॉर्पीओ आणि पिकअपसह विविध गाड्यांची चोरी करणार्‍या चार चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या पोलिसांनी अटक