घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त

अमोल भोसले- लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडा, घरफोडी आणि जबरी चोरी या सारखे गंभीर गुन्हे करणार्‍या तीन चोरट्यांना लोणी काळभोर पोलिसांनी सोमवारी (ता.२४) रात्री अटक केली आहे. त्यांच्याकडून ७ तोळे वजनाचे सोन्याचे दागीने, एक एलईडी.टिव्ही, एक डि.व्ही आर, दोन मोबाईल, एक सॅन्ट्रो कार आणि एक मोटार सायकल असा एकूण सुमारे ६ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जयसिंग काळुसिंग जुनी (वय २८, .रा. सर्वे नं.८६, बिराजदार नगर, वैदवाडी, हडपसर) सोमनाथ नामदेव घारूळे (वय २४ ) आणि बल्लुसिंग प्रभुसिंग टाक (वय २४ वर्षे, रा. सर्वे नं. ११० रामटेकडी) अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

त्यानुसार, आरोपींना पकडण्यासाठी
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली
साहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, गणेश सातपुते, अमित साळुंके, श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, निखील पवार, शैलेश कुदळे, बाजीराव वीर, रोहीदास पारखे, राजेश दराडे आणि दिगंबर साळुंके यांचे पथक तयार करण्यात आले होत.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर-सासवड महामार्गावर संदीप चिंचुरे आणि त्यांचे साथीदार ऊरुळी देवाची गावातून जात असताना, अचानक तेथे सॅन्ट्रो कारमधुन आलेल्या तीन अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवून त्यांचेकडील दोन मोबाईल चोरून नेले होते. तसेच ऊरुळी देवाची, हांडेवाडी आणि मंतरवाडी परिसरात अज्ञात तीन चोरट्यांनी चोरी करण्याचे सत्र सतत चालू ठेवले होते. यागोदरच पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी खून, जबरीचोरी, दरोडा, घरफोडी, बेकायदेशीर धंदे करणारे, तसेच शरीर व मालाविरुद्ध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणा-या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांना आदेश दिले होते.

सदर पथकातील पोलीस नाईक अमित साळुंके, बाजीराव वीर, आणि निखिल पवार हे उरुळीदेवाची- हांडेवाडी परीसरात गस्त घालत असताना, त्यांना दोन इसम संशयस्पद रित्या हांडेवाडी परीसरात मोटार सायकलवरून फिरत असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने सदर पथकाला हांडेवाडीकडून उरुळी देवाची यागावाच्या दिशेने दोन इसम मोटार सायकलवरून जात असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा इशारा दिला होता, परंतु त्यांनी मोटार सायकल न थांबवता पोलीसांना चकवा देत भरधाव वेगात पुढे निघुन गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने पकडले.

पोलिसांनी त्यांची नावे विचारली असता, त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे जयसिंग काळुसिंग जुनी आणि सोमनाथ नामदेव घारुळे अशी असल्याची सांगितली. पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता, त्यांनी त्यांचा साथीदार बल्लुसिंग प्रभुसिंग टाक याचेसह वरील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून ७३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, एक एलईडी.टिव्ही, एक डि.व्ही आर, दोन मोबाईल, एक सॅन्ट्रो कार आणि एक मोटार असा एकुण सहा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या तिन्ही गुन्हेगारांना पकडण्यासाठी अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांचे विशेष सहकार्य मिळाले.

दरम्यान, बल्लुसिंग प्रभुसिंग टाक याच्यावर ६३ गुन्हे, जयसिंग कसिंग जुनी याच्यावर ११ गुन्हे तर सोमनाथ नामदेव पारूले याच्यावर ०४ गुन्हे दाखल आहेत. वरील तीनही गुन्हेगारांकडून अधिक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

Previous articleकोपरे मांडवे गावात स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना तातडीने राबविण्याची खा.डॉ.अमोल कोल्हे यांची मागणी
Next articleकुरकुंडी येथील वृध्द महिलेची हत्या करून अत्याचार करणाऱ्या नराधमाला चाकण पोलीसांनी बेड्या ठोकल्या