कोरोना प्रतिबंधक उपकरणे, साधनांचे शासकीय दरपत्रक निश्चित करण्याची नितीन वाघ यांनी विभागीय आयुक्तांकडे केली मागणी

Ad 1

अतुल पवळे,पुणे

सध्या कोरोनाचा कहर हा महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासाठी शासन आणि प्रशासन आपआपल्या पद्धतीने काम करत आहे.यासाठी लागणारी उपकरणांची खरेदी फार मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

परंतु एक सत्य समोर येतय की यामध्ये लोक जीवन जगण्यासाठी धडपड सुरू आहे,परंतु यामध्ये काही भ्रष्टाचार देखील सुरू आहे आणि हे सत्य देखील समोर आले आहे. यासाठी शिवसेनेच्या वतीने खडकवासला विधानसभा मतदारसंघ प्रमुख नितीन वाघ यांनी विभागीय आयुक्तांना विनंती केली आहे की, या यंत्रणेचे प्रमुख म्हणून पुढाकार घेऊन यासाठी लागणार्या उपकरणांचे शासकीय दर त्याची प्रत त्याच्या गुणवत्ते नुसार जाहीर करावेत. यासाठी जिल्हातील सगळ्या शासकीय यंत्रणांना स्थानिक कारखान्यातून खरेदी करण्यास सुचित करावे.

म्हणजे मनमानी पद्धतीने खरेदी करण्यास आळा बसेल. या निवेदनात विनंती केली आहे.