डॉ.अमोल पाटील यांची ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेच्या पुणे जिल्हा सचिवपदी निवड

पुणे- ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रकाश डोंगळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष धर्मेंद्र आगरवाल,सांगली जिल्हा अध्यक्ष डॉ. राजेंद्र  सुर्यवंशी व निर्णय कमिटीने घेतलेल्या निर्णयानुसार डॉ.अमोल मोहन पाटील यांची पुणे जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली आहे.

सामाजिक कार्य, जनसेवेची आवड आणि कोरोनाच्या काळात समाजातील त्यांच्या धाडशी नेतृत्वाचा सन्मान म्हणून त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे व त्यांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

पुढील काळात पोलीस तसेच नागरिकांच्या मदतीसाठी ही संघटना भारतभर कार्य करत आहे. पुणे जिल्ह्यातील पोलीस व नागरिकांच्या सहकार्यासाठी व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी डॉ.अमोल पाटील पुणे जिल्हा सचिव पदाला साजेसे काम करतील व संघटनेचे नेतृत्व जनसामान्यांच्या सहकार्यासाठी करतील असा आम्हाला विश्वास आहे असे राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रकाश डोंगळे बोलताना म्हणाले.

प्रा. डॉ. अमोल मोहन पाटील हे अंबक गावचे असून त्यांचा जन्म 27 ऑगस्ट 1990 साली शेतकरी कुटुंबात झाला. गरीब परिस्थितीत शिक्षण घेतले, अमोल पाटील यांचे पहिली ते सातवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा अंबक येथे झाले. पुढील माध्यमिक आणि अकरावी व बारावी हे शिक्षण हे श्रीपतराव तात्या कदम प्रशाला व ज्युनिअर कॉलेज अंबक येथे पुर्ण केले. पुढील उच्च शिक्षणासाठी कराड, औरंगाबाद आणि पुणे येथील विज्ञान विभागातील वनस्पतीशास्त्र विषयामधून पीएच. डी. पदवी प्राप्त केली. अतिशय कष्टाळू व प्रामाणिक प्रयत्न करत त्यांनी समाजासाठी वेळ काढून समाजसेवा करीत आपला वेगळाच ठसा निर्माण करून दिला आहे. ते सद्या सहाय्यक प्राध्यापक यशवंतराव मोहिते कॉलेज, पुणे येथे कार्यरत आहेत. येथे वनस्पती शास्त्र विषयावर प्रभुत्व असलेले डॉ. अमोल पाटील हे समाज कार्यात मोठ्या हुरहुरीने सहभागी असतात. त्यांनी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत शिवजयंती उत्सव साजरा केला होता.
अमोल पाटील हे शासकीय विज्ञान संस्था औरंगाबाद येथील सन २०१४ बॅचचे पहीले सुवर्ण पदकाचे माणकरी आहेत.

Previous articleभावानेच भावाची एक एकर जमीन खोट्या कागद पत्राच्या आधारे लाटल्याचे उघड
Next articleतीन महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणारा अट्टल गुन्हेगार शुभम कामठे अखेर लोणी काळभोर पोलिसांच्या जाळ्यात