भावानेच भावाची एक एकर जमीन खोट्या कागद पत्राच्या आधारे लाटल्याचे उघड

शिक्रापूर ,प्रतिनिधी – शिरुर तालुक्यामध्ये पुनर्वसन विभागाचे एका मागे एक कारनामे उघड होत असताना कित्येक ठिकाणी बनावट कागदपत्रांच्या आधारे पुनर्वसनची जमीन लाटल्याचे प्रकार घडलेले असताना आता पुन्हा कोंढापुरी येथील पुनर्वसनची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे लाटल्याचे उघड झाले असून सुरेश बंडू भोळे, रमेश बंडू भोळे व शिवाजी बंडू भोळे या तिघांवर शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 

 

कोंढापुरी (ता. शिरुर) येथील काही भाग धरणग्रस्थांसाठी राखीव झाल्यानंतर येथील एक एकर जमीन पुनर्वसन झालेल्या वैभव दगडू भोळे यांच्या वडिलांना मिळाली होती, मात्र वैभव याचे वडील वारल्याने वैभव यांच्या आईने वैभवला घेऊन त्याचे मामाच्या गावाला वास्तव्य केले.

मात्र कोंढापुरी येथील जमीन वैभव यांच्या चुलत्यांनी लाटली असल्याने वैभव यांनी पुनर्वसन विभागात जाऊन कागदपत्रे तपासणी केली असताना वैभव यांच्या वडिलांच्या निधनानंतर वैभव यांच्या तीन चुलत्यांनी वैभवचे वडील दगडू भोळे यांना वारस नसल्याचे कागदपत्रात नमूद करून त्यांच्या मुलाचे व पत्नीचे नाव वारस नोंद म्हणून न लावता भावांचे व आईचे नाव लाव्जून शासनाची फसवणूक करून एक एकर जमीन लाटल्याचे समोर आले याबाबत वैभव दगडू भोळे (वय २८ वर्षे रा. गोडोली जि. सातारा) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सुरेश बंडू भोळे, रमेश बंडू भोळे व शिवाजी बंडू भोळे (तिघे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट हे करत आहे.

Previous articleदेऊळगाव राजे आडमाळ येथे सॅनिटायजरने फवारणी
Next articleडॉ.अमोल पाटील यांची ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेच्या पुणे जिल्हा सचिवपदी निवड