शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या-अभिमन्यू गिरमकर

दिनेश पवार,दौंड

बोरिबेल व परिसरातील खरबूज व कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांचे सदोष बियाणांमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ध्यावी अन्यथा लोकशाही च्या सनदशीर मार्गाने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे दौंड तालुका अध्यक्ष अभिमन्यू गिरमकर यांनी दिला आहे‌

 

 

बोरिबेल परिसरातील सुमारे 100 शेतकऱ्यांनी 50 ते 60 हेक्टर क्षेत्रात नोन यु सिड्स या कंपनीचे कुंदन वाणाचे खरबूज पीक लावले होते.लागवडीपासून एक महिन्यानंतर वेल सुकून जावू लागले परिणामी वेलाला आलेली फळे देखील शेतातच सुकून गेली, परिणामी सर्व फळे अपरिपक्व झाली यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सदर कंपनीस कृषी अधिकारी यांनी 10 दिवसाच्या आत शेतकऱ्यांशी संवाद साधून उत्तर देण्यास सांगावे.नाहीतर कंपनीच्या विरोधात कायदेशीर व लोकशाही च्या मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे अभिमन्यू गिरमकर यांनी तालुका कृषी अधिकारी यांना इशारा दिला आहे.

Previous articleतीन पत्ती जुगार खेळणाऱ्या १५ जणांवर शिक्रापूर पोलीसांची कारवाई
Next articleदेऊळगाव राजे आडमाळ येथे सॅनिटायजरने फवारणी