तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या १५ जणांवर शिक्रापूर पोलीसांची कारवाई

शिक्रापूर- कोव्हीड-१९ या रोगाचे प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे संचारबंदीचे आदेश जिल्ह्यामध्ये लागू असतानाही तसेच आपल्यामुळे कोव्हीड -१९ चा प्रसार होवू शकतो याची जाणीव असतानाही तीन पत्ती जूगार खेळणाऱ्या १५ जणांवर शिक्रापूर पोलिसांनी कारवाई करत १७ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

 

किसन वाळुंज (रा. फाकटे ता. शिरूर), नवनाथ नामदेव घोलप (रा. गोसासी ता. खेड), अतुल लक्षुमन कानडे (रा. कनेरसर ता. खेड), विजय शिंदे (रा अवसरी, ता.आंबेगाव), योगेश निश्चित (रा वाडणेर, शिरूर), संतोष गाडेकर (अवसरी आंबेगाव), सचिन चैधरी (एकतानागर ,खेड), संभाजी बांगर (वाकळवाडी, खेड), अमोल खेडकर (धमारी, शिरूर), अनिल पवार (कनेरसर खेड), संतोष हजारे, संदीप शिंदे (रा अवसरी बु आंबेगाव), सोमनाथ चासकर (रा चाकण, खेड), प्रवीण बगाटे (रा. फुटानवाडी,शिरूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि.२३ मे रोजी दुपारी १२:३० वा दरम्यान पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, फुटानवाडी गावामध्ये शेतातील पक्क्या खोलीत तीन पत्ती नावाचा जुगार भरवून खेळत आहे .गावातील युवराज सुदाम बगाटे, प्रवीण सुदाम बगाटे व सुदाम हरिशेठ बगाटे हे संगनमताने जूगाराचा अड्डा चालवत आहे. वरील माहीती मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक किरण भालेराव यांनी वरिष्ट पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांना याबाबत माहिती दिली.सदर ठिकाणी छापा टाकला असता युवराज सुदाम बगाटे, सुदाम हरिशेठ बगाटे पळून गेले.

शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण भालेराव,पोलिस हवालदार बनकर,पोलिस हवालदार मोरे, यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Previous articleसराईत गुन्हेगार घोष काळे जेरबंद
Next articleशेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या-अभिमन्यू गिरमकर