सराईत गुन्हेगार घोष काळे जेरबंद

अमोल भोसले,पुणे-सोलापूर महामार्गावरील देशपांडे व्हेज उपहारगृहाजवळ प्रवाशांची लूटमार केलेला सराईत गुन्हेगार घोष पिंटू काळे (वय १९, रा. राक्षसवाडी, ता. कर्जत, जि. नगर) याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार , अंकुश गोरोबा काळे (रा.आरे कॉलनी,  मुंबई)  हे कुटुंबीयां सोबत  मुंबईहून उस्मानाबाद येथे अल्टो कारने निघाले होते. १५ डिसेंबर २०२० रोजी रात्री ३ वाजता महामार्गावर इंदापूर बाह्यवळण देशपांडे व्हेज हॉटेलजवळ ते लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबले असता अनोळखी चार व्यक्तींनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून कारमधील चौघांना मारहाण करून त्यांच्याकडील ४६ हजार रुपये किमतीचा ऐवज लुटला होता.दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आरोपी काळे हा गावी राक्षसवाडी येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्याला राक्षसवाडी येथे ताब्यात घेण्यात आले.

 

सदर कारवाई पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे, महेश गायकवाड, नीलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरू गायकवाड यांच्या पथकाने  कारवाई केली.

Previous articleशैक्षणिक संस्थांच्या शिक्षण शुल्का बाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक
Next articleतीन पत्ती जुगार खेळणाऱ्या १५ जणांवर शिक्रापूर पोलीसांची कारवाई