दौंड मधील युवकांनी केली अन्नदानाला सुरुवात

दिनेश पवार,दौंड

कोरोना सारख्या वाईट काळात दौंड मधील युवा मुला-मुलींनी केली एक हात मदतीचा या संकल्पनेला सुरुवात केली.आज ह्या भयंकर कोरोना लॉकडाऊन च्या काळामध्ये गोरगरिब व अपंग यांना दोन वेळ नाही तर, एक वेळेचं अन्न मिळणे सुद्धा अवघड आहे.त्यांना उपाशी झोपण्या शिवाय उपाय नाही. असा विचार मनात आला कि डोळे भरून येतात व ह्या लोकांसाठी काहीतरी करावे अस वाटतं.अन्नदान हेच श्रेष्ठदान म्हणत अश्या परिस्तिथी मधे स्वतः पासुन सुरुवात केली पाहिजे असा निर्णय घेऊन एक हात मदतीचा ह्या संकल्पनेतून हेलपिंग विंग फाउंडेशन ग्रुपच्या वतीने रितेश लोखंडे, प्रीती निकम,स्वर जाधव,आदित्य ठोंबरे व त्यांचे इतर सहकारी मित्र आणि दौंड सोशल च्या वतीने जागृती वाघमारे,तृष्णा थोरात व त्यांच्या सहकारी मैत्रिणी यांनी ठरवलेल्या संकल्पनेचा पुढाकार घेऊन पासून एकत्रित येऊन दौंड व बारामती मध्ये गोरगरिबांसाठी अन्नदान व फळवाटप यास सुरुवात केली आहे.


अनेक नवीन चेहरे त्यांच्या मदतीस सामोरे येत आहेत.कोणी पैशांची मदत करत आहे तर कोणी फळे व इतर वस्तु देऊन हातभार लावत आहेत.

Previous articleदौड मध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कारवाई
Next articleप्रहार जनशक्ती पक्षाचे राजेगावमध्ये थाळीनाद आंदोलन