दावडीत सॅनिटायझर व मास्कचे वाटप

Ad 1

राजगुरूनगर-दावडी (ता.खेड) येथे कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे. दावडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी मागील वर्षापासून जीव धोक्यात घालून काम करत आहेत.येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका व आशा वर्कर यांच्या सुरक्षिततेसाठी उद्योजक राजेश कान्हूरकर यांनी सॅनिटायझर, मास्क, हायड्रोक्लोराइड व हॅन्ड ग्लोव्हजचे वाटप केले.

या प्रसंगी सरपंच संभाजी घारे, उपसरपंच राहुल कदम, मोशन क्लिप्सचे संचालक बाबासाहेब दिघे, पोलिस पाटील आत्माराम डुंबरे, ग्रामपंचायत सदस्य पुष्पा होरे, संतोष सातपुते, अनिल नेटके, ग्रामसेवक तानाजी इसवे, तलाठी सतीश शेळके, संतोष कान्हूरकर यांच्यासह दावडी उपकेंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleदोंदे परिसरात तुफान पाऊसाने शेतकऱ्यांचे नुकसान
Next articleशाळेच्या आवारात दारू आणि मटणाची पार्टी ; चौघांवर गुन्हा दाखल