दोंदे परिसरात तुफान पाऊसाने शेतकऱ्यांचे नुकसान

राजगुरूनगर-खेड तालुक्यातील दोंदे वडगाव परिसरात शुक्रवारी (दि. २१) दुपारी ३ ते ५ दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. कडुस रस्त्यावर झाडे पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

याची माहिती सरपंच चंद्रकांत बारणे यांना समजताच त्यांनी तत्काळ जेसीबी मशीन उपलब्ध करून दिल्याने वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.

दोंदे ग्रामपंचायतच्या वतीने नुकसानग्रस्तांना तत्काळ जीवनावश्यक वस्तूंचे कीट उपलब्ध करून दिले. यावेळी उपसरपंच सिद्धार्थ कोहिणकर, ग्रामसेवक निलेश पांडे, तलाठी दिपीका बच्छाव, विठ्ठल सुकाळे, मच्छिद्र सुकाळे, संभाजी कोहिणकर यांनी मदत कार्य करण्यास सहकार्य केले.

Previous articleस्व. विजय भोंग यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मित्रांनी केले अन्नदान
Next articleदावडीत सॅनिटायझर व मास्कचे वाटप