स्व. विजय भोंग यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मित्रांनी केले अन्नदान

 वाजगे, नारायणगाव – येथील वैद्यकीय प्रयोगशाळा तज्ञ विजय लक्ष्मण भोंग यांचे नुकतेच कोरोना आजाराने निधन झाले. कोरोना काळात त्यांनी रक्त लघवी चाचणीचे काम अविरतपणे केले.

या महामारीच्या काळात त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेत कधी टाळाटाळ केली नाही. परंतु दुर्दैवाने त्यांचा या महामारीच्या संसर्गाने मृत्यू झाला.
विजय भोंग हे नारायणगाव शहरांमध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर पणे कार्य करणाऱ्या एकता ग्रुपचे सचिव म्हणून काम करत होते. त्यांच्या मार्गदर्शनात एकता ग्रुपचे आरोग्य शिबिरासह अनेक सामाजिक उपक्रम होत असत. त्यांच्या निधनामुळे एकता ग्रुपची मोठी हानी झाली असल्याचे अध्यक्ष संपत वारुळे यांनी सांगितले.

विजय भोंग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एकता ग्रुप आणि स्वर्गीय विजय भाऊ यांचे कुटुंबियांच्या संयुक्त विद्यमाने नारायणगाव येथील भटकंती ग्रुप द्वारे कोविड रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सुरू असलेल्या अन्नदानासाठी बारा हजार रुपयांची देणगी देऊन दोनशे ताट अन्नदाना ची व्यवस्था करण्यात आली.

याप्रसंगी एकता ग्रुपचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.लहू खैरे, सुदीप कसाबे, रज्जाक काझी, महेश बेल्हेकर, तुलसी दिवाणी, योगेश जुन्नरकर, राजेंद्र संते, निशांत भोंग, सचिन वारुळे, संदेश गोरडे, सुयोग मुथ्था, दिलीप शिंदे, जुबेर शेख, तुषार दिवटे, प्रणव भुसारी, आदी मान्यवर उपस्थित होते.
एकता ग्रुपच्या अन्नदान सहकार्याबद्दल सुदीप कसाबे यांनी आभार व्यक्त केले.

Previous articleग्रामीण भागात लसीकरण तातडीने सुरू करण्याची सरपंच संध्या चौधरी यांची मागणी
Next articleदोंदे परिसरात तुफान पाऊसाने शेतकऱ्यांचे नुकसान