ग्रामीण भागात लसीकरण तातडीने सुरू करण्याची सरपंच संध्या चौधरी यांची मागणी

अमोल भोसले,पुणे

पूर्व हवेलीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आरोग्य विभागाकडून लसिकारणाचा वेग वाढविला आहे. परंतु मागील दोन आठवड्यांपासून कोरोना लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाला असल्यामुळे नागरिकांना लसीकरणा पासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे लसीकरण त्वरित सुरु करण्यात यावे अशी मागणी सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंच संध्या चौधरी यांनी जिल्हाधिकारी तसेच खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

पुणे येथील शासकीय विश्रामग्रहात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना सोरतापवाडीच्या सरपंच संध्या अमित चौधरी यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.२१) निवेदन देण्यात आले.

यावेळी अमित चौधरी आणि ग्रामविकास अधिकारी संतोष नेवसे उपस्थित होते. निवेदन दिल्यानंतर वरील विषयांवर सकारात्मकरित्या चर्चा पूर्ण झाली. या चर्चेत कोरोना लसीकरणाचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार आहे. तसेच गावातील विविध विकासकामांना गती देणार असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी त्यावेळी सांगितले आहे.

दरम्यान, सोरतापवाडी हे गाव कोरोनाच्या “हॉट स्पॉट”मध्ये (अतिदक्षता विभागात) डॉ. राजेश देशमुख यांनी ७ मे च्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

यामुळे येथील नागरिकांचे लसीकरण १०० टक्के होणे गरजेचे आहे. तरी या गावांचे लसीकरण त्वरित चालू करण्यात यावे. असे या निवेदनात म्हटले आहे. सोरतापवाडी उपकेंद्रांतर्गत सोरतापवाडी, नायगाव ,पेठ आणि प्रयागाधाम या गावांचा समाविष्ट आहे.

Previous articleकोरेगावमुळ कोविड सेंटरमध्ये रुग्णांना चांगल्याप्रकारे सुविधा उपलब्ध
Next articleस्व. विजय भोंग यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मित्रांनी केले अन्नदान