६३ आयसीयू ,२० व्हेंटीलेटर्स व १७५७ बेड कोरोना रूग्णांसाठी उपलब्ध हवेली उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन—प्रतिनिधी

ग्रामिण भागात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळून येत आहेत. यामुळे संसर्ग बाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काल नियंत्रण करणे व विषाणूच्या संसंर्गांत अधिक वाढ होवू नये म्हणून तात्काळ उपाय याजना आखणे आवश्यक आहे, सदर रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होवू नये व पॉझिटीव्ह रूग्णांना तात्काळ उपचार मिळावेत म्हणून हवेली तालुक्यातील आणखी ३ खाजगी रूग्णालयातील ८० टक्के बेड, व्हेंटीलेटर्स व आयसीयू अधिग्रहीत करण्याचे आदेश हवेली उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी गुरुवार ( १६ जुलै ) रोजी दिले आहेत. सदर अधिप्रहीत केलेल्या ८० टक्के बेड, व्हेटीलेंटर्स व आयसीयू मध्ये कोरोना बाधित वगळता कोणताही अन्य रुग्ण ठेवता येणार नाही. यापुर्वी तालुुुक्यातील १० रूग्णालये अधिग्रहीत करण्यात आली आहेत.

निसर्गोपचार केंद्र ( उरुळीकांचन ), लोटस हॉस्पिटल ( शेवाळेवाडी फाटा ) व योग मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल ( मांजरी बुद्रुक ) ही तीन रूग्णालये अधिग्रहीत करण्यात यावीत असे आदेश पंचायत समिती हवेलीचे गटविकास अधिकारी, तहसिलदार तसेच हडपसर व ऊरूळी कांचनचे मंडल अधिकारी व शेवाळवाडी , उरुळी कांचन, मांजरी बुद्रुक व हडपसरचे गावकामगार तलाठी यांना देण्यात आले आहेत.

यापुर्वी ८ जुलै रोजी भारत संस्कृती दर्शन ट्रस्ट, आयमॅक्स हॉस्पिटल, लाईफ लाईन हॉस्पिटल व केअर हॉस्पीटल ( वाघोली ), पल्स हॉस्पिटल ( न-हे ), महेंश स्मृती हॉस्पिटल ( शेवाळेवाडी ), प्रयागधाम हॉस्पिटल व चिंतामणी हॉस्पिटल ( कोरेगावमुळ ), श्लोक हॉस्पिटल ( शिवापूर ), शिवम हॉस्पिटल ( कदमवाकवस्ती ), नवले हॉस्पिटल ( न-हे ), विश्वराज हॉस्पिटल ( लोणी काळभोर ) ही १० रूग्णालये अधिग्रहीत करण्यात आली आहेत. यांतील एकूण १७५७ बेड, ६३ आयसीयू व २० व्हेंटीलेटर्स कोरोना रूग्णांसाठी उपलब्ध झालेली आहेत. यामध्ये वरिल ३ रूग्णालयांची भर पडली आहे. यामुळे आरोग्य विभागास बाधित व त्याचे संपर्कात आलेल्या नातेवाईक व इतरांना तात्काळ उपचार देेेण्यास मदत होणार आहे.