लॉकडाऊन काळात जुगार खेळणाऱ्याची दौंड पोलिसांकडून धुलाई

दिनेश पवार,दौंड- पोलीस स्टेशन अंतर्गत लॉक डाऊनच्या काळात कुरकुंभ गावचे हद्दीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर दौंड पोलिसांनी कारवाई करत एकास ताब्यात घेऊन चांगलीच धुलाई केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कुरकुंभ -पांढरेवाडी सेवा रस्त्यालगत पत्र्याच्या शेडच्या आडोश्याला सुरू असलेल्या कल्याण मटका जुगार अड्ड्यावर गुरुवारी(दि.२१) रोजी पोलिसांनी कारवाई केली. सदर कारवाईत 645 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत राहुल सोपान दोडके ( वय 34 रा. कुरकुंभ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय चांदणे यांनी फिर्याद दिली,दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस.एम.शिंदे,पोलीस कॉन्स्टेबल चांदणे,अमोल राऊत,राकेश फाळके यांनी ही कारवाई केली,पुढील तपास पोलीस हवालदार मारुती हिरवे करत आहेत.

Previous articleमोशी ते चांडोली रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार – खा. डॉ. अमोल कोल्हे
Next articleकोरेगाव मुळ येथील कोविड केअर सेंटरला पोलीस मिञ संघातर्फे फळवाटप