निखिलभैय्या कांचन युथ फांउडेशनच्या वतीने तीनशे नागरिकांना जीवनावश्यक किराणा किटचे वाटप

अमोल भोसले,उरुळी कांचन

कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव जगभरात वाढत असताना तसाच लॉकडाऊनचा कालावधीही वाढत असल्याने या काळात गोरगरीब, कष्टकरी, मोलमजुरी करुन खाणारे, शेतमजूर,  बांधकाम मजूर, किरकोळ छोटे – छोटे व्यवसाय करुन आपली उपजीविका चालवणारी कुटुंबे आज प्रचंड अडचणीत असताना कुटुंबाला कसे जगवायचे चालवायचे या विवंचनेतून जेरीस आली आहेत.

  समाजातील दानशूर घटक त्यांना मदतीचा हात देण्यास पुढे येत आहेत ते पण ग्रामीण भागात समाजाप्रती असलेली हीच दानशूर प्रवृत्ती निखिलभैय्या कांचन युथ फांउडेशनच्या वतीने लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एक हात मदतीचा म्हणून सामाजिक भावनेतून गोरगरीब कुटुंबांना विस ते पंचवीस दिवस पुरेल असे जीवनावश्यक किराणा किटचे तीनशे नागरिकांना वाटप करण्यात आले. गेल्या वर्षी देखील लॉकडाऊनच्या काळात निखिलभैय्या कांचन युथ फांउडेशनच्या वतीने अनेक कुटुंबांना मदतीचा हात पुढे केला होता.

 युवा उद्योजक निखिल कांचन, पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस उपाध्यक्ष शारिक सय्यद, अमोल मेहर , संदीप कांचन, सचिन कांचन, मयूर सांगले आदी मित्र परिवार उपस्थित होते.

Previous articleगुजरातला हजार कोटीची मदत मग महाराष्ट्राला सापत्न वागणूक ? महेश तपासे
Next articleसर्वसामान्यांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार