पत्रकार सुरेश वांढेकर यांच्या वाढदिवसानिमित्त बकोरीच्या डोंगरावर वृक्षारोपण

वाघोली-बकोरी (या. हवेली) येथील डोंगरावर नेहमीच वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षरोपण केले जाते आजपर्यंत शेकडो नागरीकांनी त्याठिकाणी वृक्षरोपण करुन वाढदिवस साजरे केले आहेत. त्याचप्रमाणे आज पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तसेच Ntv पुणे जिल्हा प्रतिनिधी व लोकमतचे पत्रकार सुरेश वांढेकर यांचा वाढदिवस पिंपळाची व वडाची झाडे लावून साजरा केला.त्याच बरोबर लोणीकंद पोलीस स्टेशन व वाघोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मास्क,सॅनिटायर व बिस्कीट वाटप करण्यात आले.यावेळी पोलिसांच्या वतीने विधायक काम केल्या बद्दल शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

माहिती सेवा समितीचे माध्यमातून बकोरीचे डोंगरावर एकेवीस हजार लाऊन झाडे त्यांचे संगोपन चंद्रकांत वारघडे व त्यांचे कुटुंबीय नियमित करत आहे त्यामुळे ती झाडे आज जिवंत आहेत.आज कोरोनासारख्या भयंकर आजारात ऑक्सीजन कमी पडत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या एक तरी झाड लाऊन ते जगविले पाहिजेत.असे आव्हाहन पत्रकार सुरेशजी वांढेकर यांनी केले व त्यांनी लावलेल्या झाडांचे संगोपनासाठी काही रोख रक्कमही त्यांनी समीतीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांचेकडे सुपूर्त केली.

या कार्यक्रमासाठी पुणे शहर झोन चार चे ACP जाधव साहेब,लोणीकंदचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर,प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी वर्षा गायकवाड,नागसेन लोखंडे, सकाळचे पत्रकार शरद पाबळे, निलेश कांकरिया , लोकशाही न्युजचे पत्रकार प्रमोद लांडे,सामाजीक कार्यकर्ते शिवदास पवार,सामाजिक कार्यकर्ते किशोर सातव, पोलिसनामाचे पत्रकार सचिन धुमाळ,चंद्रकांत वारघडे,धनराज वारघडे,पोलीस ठाण्यात कर्मचारी व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleथेऊर येथील ‘सह्याद्री देवराई’ रोपवाटिकेत बीयांपासून रोपनिर्मीतीची लगबग
Next articleसेझ बाधित शेतकऱ्यांचा पंधरा टक्के परताव्याचा प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्याची किसान काँग्रेस संघटनेची मागणी