शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खतांची वाढलेली दरवाढ तात्काळ रद्द करावी- खा.डॉ. अमोल कोल्हे

अमोल भोसले,उरुळी कांचन

खरीप हंगाम तोंडावर आला असताना खत उत्पादक कंपन्यांनी अचानक खतांच्या किंमती ६० टक्क्यांनी वाढविल्या. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. गेल्या वर्षीपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यातच चक्रीवादळ, अवकाळी पाऊस अशी आसमानी संकटामुळे शेतकरी मोडून गेला आहे.
यातूनही शेतकऱ्यांनी नव्या उमेदिने शेतीची कामे सुरू केली आहेत. परंतु खतांच्या किंमती वाढल्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची आणखी परवड होणार आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने उपाययोजना करावी अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

केंद्र सरकारने स्वतः पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही दरवाढ तात्काळ रद्द करण्याबाबत सकारात्मक विचार करावा असे शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी सांगितले.

Previous articleकोविड केअर सेंटरमध्ये पोलीस मिञ संघातर्फे फळवाटप
Next articleनिधीची तरतूद होऊनही खाजगी शाळा अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेतच