कोविड केअर सेंटरमध्ये पोलीस मिञ संघातर्फे फळवाटप

उरूळी कांचन -कोविड काळामध्ये जनतेला मदत व्हावी त्यांचा अनाठाई खर्च होवु नये यासाठी शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार व जि.प.सदस्या सुजाता पवार यांच्या प्रेरणेतुन आणि रावलक्ष्मी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कोविड सेंटरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. माणुसकीच्या नात्याने सामाजिक जाणिव या हेतुने पोलीस मिञ संघ महाराष्ट्र राज्य संचलित पोलीस मिञ संघ ड्रिम्स निवारा या शाखेने कोविड सेंटरला दाखल झालेल्या पेशंटला कलिंगड, चिक्कु, खरबुज, संञी, या फळांचे वाटप करण्यात आले. सदरचे फळ वाटप प्रसंगी कोरेगावमुळ ग्रामपंचायतीचे सरपंच विठ्ठल शितोळे, ग्रामपंचायत सदस्य दत्ताञय काकडे यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आले.

 

यावेळी मोफत फळवाटप करणारे पोलीस मिञ संघाचे पदाधिकारी सदस्य आरती मुन, प्रशांती साळवे, मनिषा कुंभार, रविंद्र गायकवाड, संजय साळवे, अश्वीन मुन, अमोल गजरमल, अतुल वाघमारे, गौरव शिरसाठ, सुगत कांबळे, शंकर अहिवळे, यांनी फळ वाटपासाठी योगदान दिले.

यावेळी अश्वीन मुन यांनी ग्रामपंचायत कोरेगावमुळचे सरपंच, सदस्य हे कोविड सेंटरचे व्यवस्थापन चोख करत आहेत याबद्दल मनापासुन आभार मानले तर पोलीस मिञ संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा.सुरेश वाळेकर यांनी आमदार अशोक पवार, जि.प.सदस्या सुजाता पवार आणि रावलक्ष्मी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मोफत कोविड सेंटर कोरेगावमुळ येथे उपलब्ध करुन दिल्याबद्दल विशेष आभार मानले.

यावेळी नर्सरी उद्योग समुहाचे अध्यक्ष दिलीप शितोळे, चक्रधर शितोळे तज्ञ सल्लागार व विविध कार्यकारी सोसायटी कोरेगाव मुळचे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleकोरेगावमुळ येथील कोव्हीड सेंटरला भानुदास जेधे युवा मंचच्या माध्यमातून हापूस आंब्याच्या ५०० पेट्यांचे वाटप
Next articleशेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खतांची वाढलेली दरवाढ तात्काळ रद्द करावी- खा.डॉ. अमोल कोल्हे