गर्दी करुन चिकन विक्री करणाऱ्या दुकानदारावर नारायणगाव पोलिसांची कारवाई

Ad 1

नारायणगाव (किरण वाजगे)

गर्दी करून व प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन न करता बेकायदेशीर रित्या व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या चिकन मटण विक्री करणाऱ्या दुकानदारावर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांनी दिली.

याबाबत इम्रान कासम मोमीन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी त्यांचे महाराष्ट्र चिकन सेंटर हे दुकान मास्क न लावता व पाचपेक्षा अधिक लोकांना दुकानातील चिकनची विक्री करत असताना तसेच त्यांच्या आरोग्याची कोणतीही काळजी न घेता ग्राहकांना सॅनिटायझर व हातपाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था केली नाह. तसेच याबाबत पोलिसांनी विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे तसेच जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाची अवमान्यता केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मोमीन याच्यावर भा.द.वि. कलम १८८, २६९ प्रतिबंधित अधिनियम ८९७ चे कलम २,३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दुकान नियमाचा भंग केल्याबद्दल पंधरा दिवसांसाठी सील करण्यात आले असल्याचेही घोडे पाटील यांनी सांगितले. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार कैलास ढमाले हे करीत आहेत.