जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना अटक

वाढदिवसाच्या जाहिरात

शिरूर- लॉकडाऊन काळात सर्वत्र कडक नियमांची अमंलबजावणी सुरू असताना शासनाच्या नियमांची पायमल्ली करून जुगार खेळणाऱ्या व्यक्तींवर शिरूर पोलीसांनी धडक कारवाई करत नऊ जणांना अटक केली असून १लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे यांनी दिली.

 

1

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी यांचे संचारबंदीचे आदेश जिल्हयामध्ये लागू असतानाही तसेच लॉक डाऊन काळात विना मास्क एकत्रित येत काही व्यक्ती जुगार खेळत अल्स्याची माहिती शिरूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तांदळी गावामध्ये घोडनदी पात्रालगत जून्या स्मशानभूमीचे जवळ अचानक छापा टाकला.

 

यावेळी आरोपी गणेश गायकवाड हा काष्टी (ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर) च्या दिशेने पळून गेला.तर सदर ठिकाणी गोपीनाथ बबन गायकवाड,प्रकाश विलास डोईफोडे,नूरमूहम्मद जिम्मूभाई सय्यद(सर्व रा.काष्टी ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर), सुभाष एकनाथ खोरे,बाबूलाल याकूब शेख,शामल राजाराम गोवर्धन,निलेश हरीश्चंद्र बल्लाळ,गणेश दत्तू रासकर,राजू गूलाब गायकवाड, (रा.सर्व रा.तांदळी ता.शिरूर जि.पुणे) हे जुगार खेळताना मिळून आले.

याप्रकरणी पोलिसांनी दहा आरोपींवर गुन्हा दाखल केला असून सुमारे १लाख ४४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे,पोलिस शिपाई गोरे,पोलिस कॉन्स्टेबल विशाल कोथळकर,होमगार्ड धर्मा खराडे,होम गार्ड शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Previous articleउरूळीत पोलीसांना सॅनिटायझरचे वाटप
Next articleबोरिबेल परिसरातील खरबूज जाग्यावरच जळून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखोंचे आर्थिक नुकसान