जुन्नर तालुक्यात कोरोना चा हाहाकार

नारायणगाव -(किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यामध्ये आज कोरोना बाधित रुग्णांची संख्या तब्बल २८ ने वाढली असून आजपर्यंत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल २३७ एवढी झाली आहे. अशी माहिती गट विकास अधिकारी हेमंत गरीबे यांनी दिली.

नारायणगाव वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत नारायणगाव येथील तीन, वारूळवाडी येथे दोन ओझर नवीन गावठाण येथे तीन, आर्वी येथे चार व धालेवाडी येथील एक रुग्ण कोरोणा बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली.

दरम्यान आमदार अतुल बेनके यांचा चालक काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. आज या चालकाची मुलगी देखील पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आला आहे. नारायणगाव येथील तीन जणांचा तर वारूळवाडी येथील दोघांचा कोरोणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जुन्नर येथील नऊ जणांचा, बेल्हे येथील तीन, खामगांव बोरी व आगर येथील प्रत्येकी एक जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर लेण्याद्री कोवीड सेंटर येथील एका ॲम्बुलन्स च्या चालकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

जुन्नर मधील एका वृद्धाचे आज कोरोना विषाणू मुळे पुणे येथे उपचार घेताना निधन झाले असून आजपर्यंत कोरोना मुळे तालुक्यातील एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण ८३ रुग्णांना बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले आहे.

दिवसेंदिवस जुन्नर तालुक्या वर कोरोना विषाणू चे सावट गडद होत चालले असताना सर्वच नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन नारायणगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजून घोडे पाटील व सरपंच योगेश पाटे यांनी केले आहे.

Previous articleरोटरी क्लब नारायणगाव तर्फे शिक्षकांसाठी ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन
Next articleगर्दी करुन चिकन विक्री करणाऱ्या दुकानदारावर नारायणगाव पोलिसांची कारवाई