रोटरी क्लब नारायणगाव तर्फे शिक्षकांसाठी ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन

Ad 1

नारायणगाव (किरण वाजगे) – रोटरी क्लब ऑफ नारायणगाव यांच्यावतीने शिक्षकांसाठी ऑनलाइन कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले.

कोरोनाविषाणू च्या प्रादुर्भावामुळे अनिश्चित लॉक डाउन सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणात अडचणी येताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत जुन्नर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व सहशिक्षक यांच्यासाठी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब नारायणगावच्या वतीने “ऑनलाइन कार्यशाळेचे ” नुकतेच आयोजन विनामूल्य करण्यात आले अशी माहिती प्रेसिडेंट सचिन घोडेकर यांनी दिली.
ही ऑनलाइन कार्यशाळा दोन टप्प्यात घेण्यात आली असून तालुक्‍यातील सुमारे २५० शिक्षकांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
या प्रशिक्षणास रो. डॉ. अमित आंद्रे यांनी विशेष ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करून ‘ऑनलाइन शिक्षणाचे तंत्र व मंत्र’ शिक्षकांना शिकवले.
शिक्षकांनी या नवीन शिक्षण पद्धतीचा अवलंब केला पाहिजे व नवीन कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत असे मत रोटारीच्या वतीने अध्यक्ष सचिन घोडेकर यांनी व्यक्त केले. त्यासाठी भविष्यात अशाच अनेक विषयावरील कार्यशाळा रोटरी क्लब नारायणगाव तर्फे नियोजित करण्यात आल्या आहेत.
कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी रो. योगेश भिडे,रो.डॉ काचळे,रो.मंगेश मेहेर व रो.कमलाकांत मुंढे यांनी नियोजन केले.
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे डिस्ट्रिक्ट लिटरसी कमिटीचे अनेक पदाधिकारी यांनी देखील या प्रशिक्षण वर्गाला उपस्थित राहून शिक्षकांना मार्गदर्शन केले.