ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या वतीने आयोजित शिबिरात २२८ रक्तदात्यांनी केले रक्तदान

अमोल भोसले,उरुळी कांचन

राज्यसह देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला असून, या परिस्थितीत रुग्णांना रक्ताची गरज आहे. त्यांना रक्त उपलब्ध व्हावे. यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून रक्तदान करण्याचे अवाहन करण्यात आले होते. या अवाहनाला उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपने चांगला प्रतिसाद दिला आहे. तसेच हा ग्रुप नेहमी सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असतो. या ग्रुपचे कार्य हे कौतुकास्पद आहे असे मत उरुळी कांचनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार यांनी मांडले.

उरुळी कांचन (ता. हवेली) येथे ड्रीम्स युवा सोशल फाऊंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप व आधार ब्लड सेंटर धनकवडी –
ग्रामपंचायत उरुळी कांचन, प्राथमिक आरोग्य केंद्र, अजिंक्य फाउंडेशन, हवेली तालुका पत्रकार संघ, लोणी काळभोर पोलीस स्टेशन, महात्मा गांधी सर्वोदय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान आणि प्लाझ्मादान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष प्रा. के.डी.कांचन, जिल्हा परिषदेच्या सदस्या कीर्ती अमित कांचन, सरपंच संतोष कांचन, पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, उपसरपंच संचिता कांचन, प्राचार्य बबनराव दिवेकर, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक सुनिल जगताप, हवेली तालुका पत्रकार संघाचे मानद सदस्य डॉ मोहन वाघ, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस, वैद्यकीय अधिकारी सुचिता कदम, ग्रामपंचायत सदस्य अमित कांचन, भाऊसाहेब कांचन, मिलिंद जगताप, सुनिल तांबे, रेल्वे समितीचे सदस्य अजिंक्य कांचन, भाऊसाहेब तुपे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष जयदीप जाधव, श्रीकांत कांचन, शरद खेडेकर, डॉ.समिर ननावरे, संतोष चौधरी, शांताराम चौधरी, किरण वांझे, शिवाजी नवगिरे, शैलेश गायकवाड, महादेव काकडे, शैलेश बाबर, आधार ब्लड सेंटर धनकवडीच्या डॉ. अलका शिंदे, व्यस्थापक सिद्राय हेगले, परिचारिका आणि ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिरात २२८ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. यात २१८ पुरुष व १० महिलांचा समावेश होता. तर, १८ नागरिकांचे अँटिबॉडीज तपासणीसाठी रक्ताचे नमुने देण्यात आलेले आहेत. प्रत्येक रक्तदात्यास झाड आणि प्रशस्तिपत्रक देण्यात आले आहे. तर अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन च्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास वाफेचे मशीन भेटवस्तू स्वरूपात देण्यात आले आहे.

दरम्यान, रक्तदान करण्यासाठी आलेल्या तरुणांच्या आरोग्याची विशेष काळजी शिबिरात घेण्यात आली. शिबिरात वारंवार सॅनिटायझरचा वापर करून उपस्थितांचे हात निर्जंतुकीकरण केले जात होते. उरुळी कांचन ग्रामस्थांनी रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद दिला.

Previous articleपं.रवीशंकर यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त कोरोना मुक्त भारत या विषयी राज्य स्तरीय चर्चा सत्र
Next articleउद्योजक राजेश कोतवाल यांच्या कडून कोविड सेंटरला २५००० हजाराचा धनादेश