चिंचवड देवस्थानची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ११ लाखांची मदत

अमोल भोसले, पुणे

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे . यामुळे सह- धर्मदाय आयुक्त सुधीर बुके पुणे विभाग यांनी जिल्ह्यातील धार्मिक संस्थांना कोव्हीडसाठी आर्थिक मदतीने आवाहन केले होते . यानुसार चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने (दि .१४ ) रोजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११ लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजीत पवार यांकडे दिला असल्याची माहीती देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी दिली.

राज्याच्या शहरी व ग्रामीण कोरोना रुगणांची संख्या वाढत चालली आहे . यामुळे जिल्ह्यातील धार्मिक संस्थांनी कोव्हीड केंद्र अथवा आर्थिक मदतीचे आवाहन पुणे जिल्हा सह धर्मदाय आयुक्तांनी केले होते. यानुसार चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने खारीचा वाटा म्हणून शासनास आर्थिक मदत करण्याचे ठरवले होते . यानुसार (दि १४) रोजी विधान भवन पुणे येथे कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सह- धर्मदाय आयुक्त सुधीर बुक्के, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, आमदार अशोक पवार, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त विश्राम देव , आनंद महाराज तांबे ,राजेंद्र उमाप, विनोद पवार, तालुका अध्यक्ष दिलिप वाल्हेकर हे उपस्थित होते.

यावेळी सह – धर्मदाय आयुक्त, व विश्वस्त मंडळाच्या हस्ते सदर रकमेचा धनादेश उपमुख्यमंत्री यांकडे देण्यात आला .

कोरोना काळात राज्य शासनामार्फत कोरोना रुग्णांना चांगल्या सुविधा पुरवत आहोत. यात राज्यातील धार्मिक संस्थाही हातभार लावत आहेत ही कौतुकाची बाब असल्याचे प्रति पादन अजित पवार यांनी केले .

चिंचवड देवस्थान ट्रस्टने गतवर्षी ससून रुग्णालयास व्हेंटेलेटर खरेदीसाठी एकवीस लाख रुपयांची देणगी दिली होती. या देवस्थानचे सामाजिक कार्यही खरोखरच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सह धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे कोव्हीड काळातील काम चांगले असल्याचे पवार पुढे बोलताना म्हणाले .

Previous articleआमदार राहुल कुल यांच्या संकल्पनेतील ‘डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर’ व ‘कोव्हीड केअर सेंटरचे ऑनलाइन उदघाटन
Next articleपं.रवीशंकर यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त कोरोना मुक्त भारत या विषयी राज्य स्तरीय चर्चा सत्र