देऊळगाव राजे येथे कोविड केअर सेंटरचे उदघाटन

दिनेश पवार,दौंड

देऊळगाव राजे येथील सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे गुरुवार (दि.13 ) मे रोजी कोविड केअर सेंटरचे उदघाटन सिद्धेश्वर विद्यालयाचे सचिव हरिभाऊ ठोंबरे यांच्या हस्ते व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेखा पोळ, माऊली आण्णा ताकवणे,विकास शेलार,अभिमन्यू गिरमकर, कानिफनाथ सूर्यवंशी,पंकज बुऱ्हाडे,सतीश अवचर, केशव काळे, बापूराव भागवत,पोलीस पाटील सचिन पोळ,योगेश बोबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे, शहरी भागासह ग्रामीण भागात देखील कोरोना चा प्रादुर्भाव वाढत आहे, दौंड च्या पूर्व भागात देखील काही गावांमध्ये कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात दिसून येत आहे, बाधित रुग्णांना स्वामी चिंचोली येथे किंवा लिंगाळी येथील कोविड केअर सेंटर येथे उपचार घेण्यासाठी जावे लागत होते. आता येथेच सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवरती विलगिकरण करून उपचार केले जाणार आहे,सिद्धेश्वर विद्यालय याठिकाणी ५० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे,हे सेंटर सुरू करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू गिरमकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार राहुल दादा कुल यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

या कोविड केअर सेंटर मध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.सुमित सांगळे,डॉ.अजय पोतन, डॉ.कोमल गावडे,परिचारिका रिबिका गायकवाड, सुनीता चव्हाण,सोनाली मागडे,अजय घेगडे,अभिषेक चव्हाण हे कर्मचारी येथील रुग्णांवर उपचार करणार आहेत

Previous articleनारायणगाव बाह्यवळण रस्ता येत्या महिनाभरात वाहतुकीसाठी सुरू होणार – माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील
Next articleआमदार राहुल कुल यांच्या संकल्पनेतील ‘डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर’ व ‘कोव्हीड केअर सेंटरचे ऑनलाइन उदघाटन