अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई

राजगुरुनगर: गुटखा, पानमसाला व तंबाखू आणि एक मोटारसायकल असा सुमारे एक लाख ८८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल खेड पोलिस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे.

अक्षय जयवंत शिंगोटे (वय २०), संतोष अंतुनाथ चव्हाण (वय ४०), अकलाब अब्दुलसत्तार आतार (वय ४५ ) या आरोपींना खेड पोलिसांनी अटक केली

मिळालेल्या माहितीनुसार,पुणे -नाशिक महामार्गावर पानमळा येथे एकाला ताब्यात घेतल्यावर जवळील पोत्यामध्ये सुमारे ५० हजार रुपयांचा गुटखा मिळून आला. सखोल चौकशी केल्यावर त्याने गुटखा नारायणगाव येथून खरेदी करून विक्रीसाठी आणला असल्याची पोलिसांना कबुली दिली.खेड पोलिसांनी नारायणगाव येथे जाऊन पोलिसांच्या मदतीने संतोष अंतुनाथ चव्हाण, अकलाब आतार यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विक्रीसाठी ठेवलेला वेगवेगळया प्रकाराचा गुटखा, तंबाखु असा १ लाख ३७ हजार रुपयांचा अवैधरित्या बाळगलेला गुटखा,एक मोटारसायकल जप्त करुन आरोपीला अटक केली


सदर कारवाई खेड पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शोध पथकाचे पोलिस निरिक्षक भारत भोसले आणि त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलिस निरिक्षक सतीश गुरव करत आहे.

Previous articleकाळूस मध्ये घरोघरी आरोग्य तपासणी
Next articleनारायणगाव बाह्यवळण रस्ता येत्या महिनाभरात वाहतुकीसाठी सुरू होणार – माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील