काळूस मध्ये घरोघरी आरोग्य तपासणी

चाकण- covid-19 महामारी पासून आपल्या काळुस गावाचा बचाव करण्यासाठी आरोग्य तपासणी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य,मा.सरपंच ग्रामपंचायत काळुस यांनी स्वत:, आरोग्य विभागाचे कर्मचारी,शिक्षक,आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी,चोरमले तलाठी भाऊसाहेब, जाधव ग्रामसेवक,डाँ इंदिराजी पारखे,स्मिता वानखेडे,व समाजसेवक यांनी लोकसंख्येच्या दृष्टीने खेड तालुक्यांमध्ये मोठे असलेले काळुस गाव नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी केली.

यामध्ये संशयीत नागरिकांची कोविड तपासणी केली तपासणीअंती कोणीही कोरणा पॉझिटिव आढळले नाही हीच खरी आनंदाची व समाधानाची बाब म्हणावे लागेल. सरपंचांनी पाच दिवस संपूर्ण काळुस गाव बंद ठेवण्याचे गावातील सर्वांना आवाहन केले या आव्हानाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे. गावामध्ये फवारणी करून तसेच लोकांना मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे वेळोवेळी हात धुणे असे घरोघरी जाऊन जनजागृती केले.


या मोहिमेमध्ये उपसरपंच यशवंत खैरे मा सरपंच श्री योगेश शेठ आरगडे , मोहनराव पवळे सर ,गणेशशेठ पवळे डायरेक्टर आण्णासाहेब मगर बँक, ग्रामपंचायत सदस्य दत्ता पोटवडे, संदिप टेमगिरे,संजय कदम , नितीन दौंडकर,माणीक खैरे , अनिल आरगडे, रोहिदास (आबा) पवळे ,दिनेश हाटाळे यांनी सहभागी होऊन नियोजन केले.

Previous articleदेऊळगावं राजे येथे दुसऱ्या डोससाठी लसीकरण
Next articleअवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई