देऊळगावं राजे येथे दुसऱ्या डोससाठी लसीकरण

वाढदिवसाच्या जाहिरात

दिनेश पवार,दौंड

देऊळगाव राजे येथील जिल्हा परिषद च्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे 45 वर्षे पुढील वयोगटातील नागरिकांसाठी कोविड 19 च्या दुसऱ्या डोससाठी बुधवार (दि.12) मे रोजी लसीकरण मोहीम राबविण्यात आली,देऊळगाव राजे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुमित सांगळे,डॉ. कोमल गावडे,तसेच परिचारिका यांनी नियोजनबद्ध ही मोहीम राबवत लसीकरण यशस्वी केले.


वाढत्या कोरोना प्रादुर्भावावर उपयोजन म्हणून लसीकरण हा प्रभावी उपाय ठरत आहे तसेच लस ही अत्यंत सुरक्षित असल्याने या लसीकरणासाठी नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे,यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल बाबा जगदाळे,देऊळगाव राजे चे माजी सरपंच अमित गिरमकर,मदन खेडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते

Previous articleपोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ यांची कौतुकास्पद कामगिरी
Next articleकाळूस मध्ये घरोघरी आरोग्य तपासणी