पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ यांची कौतुकास्पद कामगिरी

दिनेश पवार,दौंड

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ यांनी दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन महिन्याचा प्रशिक्षण कालावधी नुकताच पूर्ण केला, या दोन महिन्यात कायदा सुव्यवस्था व शांतता अतिशय चांगल्या प्रकारे हाताळत दमदार कामगिरी केली आहे.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन महिन्यांच्या कालावधीत अवैध वाळू माफियांवर कारवाई,बेकायदेशीर जुगार,मटका,गुटखा,बेकायदेशीर दारू विक्री,अवैध हातभट्टी दारू कारखाने यावरती त्यांनी धडक कारवाई करत परिसरातील अवैध व्यवसाय करणाऱ्याना जरब बसविण्याचे काम केले,तर सर्वसामान्य जनतेच्या मनात पोलिसांविषयी,कायद्याविषयी आपलेपणा निर्माण करण्याचे काम केले, दोन महिन्याच्या कालावधी वेगवेगळ्या 31 कारवाया करत तब्बल 4 कोटी 51 लाख रुपये किमतीचा माल जप्त करत संबंधितावर गुन्हे दाखल केले.

कोरोना च्या प्रादुर्भावात देखील गर्दी होवू न देणे,विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई करणे,शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानावरती कारवाई करणे,अशी कामगिरी त्यांनी या दोन महिन्यांत केली आहे,या कालावधीत काही पोलीस कर्मचारी कोरोना बाधित झाले त्याची स्वतः विचारपूस करून मनोबल वाढेल यासाठी मार्गदर्शन केले,लॉकडाऊन परिस्थिती मध्ये सर्वांची आर्थिक परिस्थिती कमकुवत बनली असताना भुजबळ यांनी दौंड पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या निराधार जेष्ठ नागरिकांना घरी जाऊन आवश्यक वस्तू देणायचे काम केले.

 वर्दीत माणुसकीपण असते या वृत्ती ची प्रचिती त्यांनी दाखवून दिली आशा कर्तव्यनिष्ठ पोलीस उपअधीक्षक यांनी आपल्या कामाची सुरुवातच दमदार पद्धतीने केली आहे, माणुसकी,आपलेपण, सहकार्याची भावना जपणाऱ्या या पोलीस उपअधीक्षक यांचा प्रशिक्षण कालावधी संपल्याने त्यांना सर्व सहकाऱ्यांच्या वतीने व दौंड करांकडून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या

Previous articleएमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त उद्या १३ मे रोजी संवाद साधणार…
Next articleदेऊळगावं राजे येथे दुसऱ्या डोससाठी लसीकरण