साहित्यिक व कलावंत मानधन जिल्हास्तरीय समितीच्या सदस्यपदी हभप.आनंद तांबे महाराज

अमोल भोसले,उरुळी कांचन

पुणे जिल्ह्यातील वृद्ध साहीत्यीक व कलावंतांना मानधन देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी निर्देशित केल्यानुसार जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे . त्याच्या अध्यक्षपदी पुणे येथील शशीकांत धोंडीबा कोठावळे यांची निवड करण्यात आलेली आहे .तर हवेली तालुक्यातील थेऊर येथील चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त हभप आनंद विश्वनाथ तांबे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय, सांस्कृतीक कार्य ,क्रिडा व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडील शासन निर्णया नुसार वृद्ध साहीत्यीक व कलावंतांना मानधन देण्यासाठी पुणे जिल्हा समीती गठीत करण्यात आली आहे .

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी सूचीत केल्यानुसार पाच अशासकीय लोकांची निवड करण्यात आली आहे . यानुसार पुणे येथील शशीकांत धोंडीबा कोठावळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .
तर चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्तपदी कार्यरत असलेले थेऊर येथील हभप आनंद विश्वनाथ तांबे यांची भजन किर्तन प्रतीनीधी पदी निवड करण्यात आली आहे.

शिरुर – हवेलीचे आमदार अशोक पवार व हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांच्या शिफारस नुसार संधी मिळाली.जास्तीत जास्त कलावतांना मानधन मिळ्वून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे हभप आनंद तांबे महाराज यांनी सांगितले.

Previous articleसोरतापवाडी- पुरोगामी माध्यमिक विद्यालयाच्या लसीकरण उपकेंद्रास सॅनिटायझर कॅन भेट
Next articleलोणी काळभोर – पोलिसांच्या मदतीला तीस विशेष पोलिस अधिकारी