पत्नीसह एका वर्षाच्या मुलाची हत्या, पतीची गळफास घेऊन आत्महत्या

अमोल भोसले,उरुळी कांचन

लॉकडाउनमुळे बेरोजगार झालेल्या एका टेम्पो चालकाने पत्नी व एक वर्ष वयाच्या लहान मुलाचा खून करून स्वतः ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कदमवाकवस्ती ( ता हवेली ) ग्रामपंचायतीच्या हद्दीत रविवारी (ता. ९) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

हनुमंत दर्याप्पा शिंदे ( वय ३८, सध्या रा. वाकवस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली, मुळगाव- बक्षी हिप्परगा जि. सोलापूर ) याने स्वत: आत्महत्या करण्यापूर्वी पत्नी प्रज्ञा ( वय २८ ) हिचा गळा आवळून तर लहान मुलगा शिवतेज ( वय १ वर्षे २ महीने ) याचा धारदार सुरीने गळा चिरून खुन केला. आणि नंतर त्याने ओढणीच्या सहाय्याने बेडरूममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

याप्रकरणी हनुमंत याचे वडील दर्याप्पा अर्जुन शिंदे ( वय ६२ ) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत हा सिमेंटच्या टेम्पोवर चालक म्हणुन काम करत होता. आणि त्याची पत्नी प्रज्ञा ही घरकाम करून घरामध्ये शिवणकाम करत होती. हनुमंत यास लॉकडाउनमुळे काम नसल्याने गेल्या तीन महिन्यांपासून तो घरी होता. आर्थिक अडचणीने पती-पत्नीत किरकोळ वाद होत होते.

दर्याप्पा यांचे एकत्रित कुटुंब आहे. रविवार (ता. ९) दर्याप्पा दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घरी आले. त्यावेळी त्यांचे नातू प्रथमेश व नात ईश्वरी हे हॉलमध्ये टी.व्ही पाहत बसले होते. तर मुलगा हनुमंत, सुन प्रज्ञा आणि नातु शिवतेज हे त्यांच्या बेडरूममध्ये होते. बेडरूमचा दरवाजा आतून बंद केला होता. मुलगा व सुन हे नेहमीप्रमाणे दुपारी जेवण झाल्यावर बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेले.

हणुमंत हा सायंकाळी आठ वाजेनंतरही बेडरुमचा दरवाजा उघडत नसल्याचे पाहुन, दर्याप्पा, प्रथमेश व ईश्वरी यांनी दरवाजा उघडावा यासाठी हणुमंत व प्रज्ञा यांना आवाज देण्यास सुरुवात केली. मात्र कसलाही आवाज येत नसल्याने, दर्याप्पा यांनी रात्री आठ वाजेच्या सुमारास हणुमंत यांच्या बहीणीला फोन करुन, हणुमंत दरवाजा उघडत नसल्याची माहिती दिली. यावर ही बाब सोमनाथ यालाही कळवली. सोमनाथ व त्याच्या बहिणीने दहा वाजता येऊन, हणुमंत याच्या बेडरुमचा दरवाजा उघडण्साठी हणुमंत यांना आवाज दिला.

परंतु, हनुमंत हा कसलाच प्रतिसाद येत नसल्याचे लक्षात येताच, स्थानिक नागरीकांनी हणुमंत याच्या बेडरुची मागिल खिडकी तोडली. खिडकीतुन आत पाहिले असता, हणुमंत हा पंख्याला गळफास घेतल्याच्या अनवस्थेत तर प्रज्ञा व शिवतेज निपचीत पडल्याचे आढळुन आले. ही बाब लोणी काळभोर पोलिसांना समजताच, वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलिस निरीक्षक सतीश काळे, पोलिस उपनिरीक्षक भागवत शेंडगे, जयंत हन्चाटे व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल आले.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बेडरूमच्या पश्चिमेकडील खिडकीच्या जाळीमधून पाहणी केली असता, हनुमंत हा बेडरूम मधील पंख्याला गळफास घेवुन लटकत असलेला अवस्थेत दिसला. पोलिसांनी जमलेल्या लोकांच्या मदतीने एका बांबूच्या काठीच्या सहाय्याने दरवाजाची कडी आतल्या बाजुने वर उचलली. त्यानंतर आत जाऊन पाहिल्यावर सून प्रज्ञा मृत अवस्थेत होती. तर तिच्या शेजारी नातू शिवतेज याच्या गळयावर धारदार सुरीने कापल्याने तो ही मृत असल्याचे दिसले. मृतदेहाची पाहणी करून त्यांचा मृत्यु झाल्याची खात्री झाल्याने पंचनामा करून तीनही मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदणासाठी पाठविण्यात आले आहेत.

Previous articleबुचकेवाडीत संघाच्या माध्यमातून प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आरोग्य किटचे वाटप
Next articleमास्क व सॅनिटायझर वाटप करून वाढदिवस साजरा