महावितरण कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला मॅजेस्टिक सोसायटीने केली आर्थिक मदत

वाघोली : (कल्याण साबळे पाटील) महावितरण कार्यालयातील कर्मचारी सचिन नाकतोडे यांचा कोरोनामुळे निधन झाले असल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून वाघोली येथील मॅजेस्टिक सिटी सोसायटीच्यावतीने नाकतोडे यांच्या पत्नी रश्मी नाकतोडे यांना आर्थिक मदत करण्यात आली.

वाघोलीचे सहाय्यक अभियंता गणेश श्रीखंडे यांच्या माध्यमातून एकूण ७६ हजार रुपयांची रक्कम मॅजेस्टिक सिटीचे चेअरमन संजय सातव पाटील व सोसायटी धारकांच्या उपस्थितीत रश्मी नाकतोडे यांना देण्यात आली.

Previous articleदौंड- वैशाली नागवडे यांनी कोविड सेंटरला भेट देऊन रुग्णांची केली विचारपूस
Next articleजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांच्या निर्णयाचा जुन्नर तालुक्यातील सरपंचांनी केला निषेध