दौंड- वैशाली नागवडे यांनी कोविड सेंटरला भेट देऊन रुग्णांची केली विचारपूस

सचिन आव्हाड,दौंड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी दौंड मधील तीन कोविड सेंटर ला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली . तसेच त्यांनी रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी तांत्रिक अडचणींबाबत प्रांत अधिकारी ,तहसीलदार यांच्याशी फोन द्वारे संपर्क साधून मार्ग काढण्याची विनंती केली .

सध्या सर्वत्र कोरोना या संसर्गजन्य व्हायरस ने बधितांची संख्या वाढत आहे. अनेक रुग्ण हे कोविड सेंटर मध्ये उपचार घेत आहेत . दौंड तालुक्यातील वाहेगुरु कोव्हीड क्वारंटीन सेंटर सिंधी धर्मशाळा दौंड , गुजराती भवन कोवीड सेंटर दौंड , व शिव जनसेवा कोविड सेंटर दौंड ह्या तीन सेंटर ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली नागवडे भेट देऊन पाहणी केली .तसेच रुग्णांची विचारपूस केली .

दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ . सुरेखा पोळ आणि दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संग्राम डांगे यांच्याशी त्यांनी येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली . रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून या तांत्रिक अडचणींबाबत दौंड – पुरंदर चे प्रांत प्रमोद गायकवाड , तहसीलदार संजय पाटील , सिविल सर्जन नांदापूरकर यांच्याशी फोन द्वारे संपर्क साधून मार्ग काढण्याची विनंती केली. असल्याची माहिती वैशाली नागवडे यांनी दिली .

नानगाव कोविड सेंटर ला वाफेच्या मशिन्स भेट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी दौंड नानगाव ग्रामपंचायत व नानगाव प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी सुरु केलेल्या कोविड केअर सेंटर ला भेट दिली . रुग्णांची विचारपूस केली . कोरोना रुग्णांना वाफ घेण्यासाठी वाफे मशीन्स त्यांना या कोविड सेंटर ला भेट दिल्या.

Previous articleनियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांना दौंडमध्ये सील
Next articleमहावितरण कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला मॅजेस्टिक सोसायटीने केली आर्थिक मदत