नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांना दौंडमध्ये सील

दिनेश पवार,दौंड

महाराष्ट्र शासनाने कोरोना चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नियमांचे पालन करणे बंधनकारक केलेले असताना दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काही दुकाने अत्यावश्यक सेवेत येत नसताना देखील सुरू असल्याने दौंड पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय दौंड तसेच दौंड नगरपरिषद दौंड यांच्या वतीने संयुक्त कारवाई करत दौंड मध्ये पाच दुकाने 30 दिवसासाठी सीलबंद करण्यात आली आहेत

लॉकडाऊन च्या कालावधीत अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या दुकानाना दिलेल्या वेळेत उघडण्यास शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे, परंतु जी दुकाने अत्यावश्यक सेवेत येत नसताना देखील ती उघडण्यात आल्याने दौंड पोलीस स्टेशन चे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ व तहसीलदार संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

यामध्ये शिव संगम कलेक्शन,मॅगी कलेक्शन,जय मॉ कलेक्शन, अरिहंत कलेक्शन,धी दौंड क्लॉथ स्टोअर्स सर्व शिवाजी चौक दौंड येथील दुकाने दि.6 मे पासून ते पुढील 30 दिवस व त्यानंतर तहसील कार्यालयाचा आदेश होईपर्यंत या आस्थापना सीलबंद करण्यात आलेल्या आहेत, कोरोना चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्वांनी प्रशासनाचे नियम पाळणे गरजेचे आहे, सोशल डिस्टन्स पाळणे,मास्क वापरणे,सॅनिटायजर वापरणे गरजेचे आहे

Previous articleजागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त कृषी पर्यटन परिसंवाद
Next articleदौंड- वैशाली नागवडे यांनी कोविड सेंटरला भेट देऊन रुग्णांची केली विचारपूस