हरलो नाही आम्ही लढलो ! ७५ वर्षाच्या जेष्ठ आई सह एकाच कुटुंबातील पाच जण कोरोनामुक्त

कल्याण साबळे पाटील,वाघोली- कोरोना विरूद्ध लढलेल्या एका कुटूंबातील पाच सदस्य ज्येष्ठ आईसह कोरोनावर केली मात ,पुणे जिल्ह्यातील बकोरी या छोट्याश्या गावातील सामाजिक क्षेञात,काम करणाऱ्या निसर्गप्रेमी चंद्रकांत वारघडे यांच्या कुटूंबातील एकामागून एक अशा पाच जणांना कोरोनाने गाठले ,यामध्ये त्यांनी हार न मानता ते लढले आणि ७५ वर्ष वयाच्या आई सह सर्वजण यशस्वी रित्या कोरोनावर मात करत घरी परतले.

याविषयी बोलताना चंद्रकांत वारघडे यांनी सांगितले की ”त्रास सुरू झाल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन लगेच एका पाठोपाठ एक एक करत,एकाच रुग्णालयात दाखल झालो.यावेळी सर्वांनी घाबरून न जाता एकमेकांना आधार दिला, खूप सकारात्मक विचार ठेवले,त्यामुळे ७५ वर्ष वयाच्या आईसह आम्ही पाच ही जण कोरोनामुक्त झालो”,

तर याविषयी अधिक माहिती देताना वारघडे यांनी सांगितले की, माझी मुलगी धनश्री (वय २१) हिला प्रथम कोरोनाचा त्रास झाला. ताप अधिक असल्याने कोरोनाचा संशय आला.तिची चाचणी करून तिच्यावर लगेच उपचार सुरू केले. मात्र, दोन दिवसात त्रास कमी न झाल्याने तिला रुग्णालयात दाखल केले. मग सर्वांच्याच चाचण्या केल्या.माझी आई कमल (वय ७५) व पत्नी माया (वय ४०) यांनाही त्रास झाल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल केले.दरम्यान मला( चंद्रकांत वारघडे) व मुलगा धनराज ( वय २१ )यांनाही त्रास होऊ लागला.मग मुलालाही त्यांनी दाखल केले. सगळ्यात शेवटी मी (चंद्रकांत वारघडे) दाखल झालो. मी (चंद्रकांत वारघडे)आधी दाखल झालो असतो तर सर्वच कुटुंबीय खचले असते.सर्वजण एकाच रुग्णालयात असल्याने थोडा एकमेकांना धीर होता.वय जास्त आल्यामुळे आईची जास्त काळजी होती.मात्र मी घरातील कर्ता पुरुष यामुळे मी माझ्या काळजावर दगड ठेऊन सर्वाना धीर दिला आणि खूप सकारात्मक विचार करत सकारात्मक राहिलो.यामुळे पाचही जण कोरोनातून मुक्त झाले.आता सर्वजण रुग्णालयातून सुखरूप घरी आलो आहोत

मुळात अशी वेळ कोणत्याही कुटुंबावर येऊ नये.त्रास जाणवल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.घाबरून जाऊ नका. खूप सकारात्मक रहा.अन्य कुटुंबीय व मित्रांनीही खूप आधार दिला. यामुळे कोरोनातून मुक्त झालो.सर्वाना कळकळीची विनंती आहे.मास्क,सॅनिटायझर व सोशल डिस्टनसिंग या त्रिसूत्रीचा वापर करा.”अशा मोलाचा सल्ला देखील चंद्रकांत वारघडे यांनी दिला आहे.

Previous articleवारूळवाडी मध्ये दोन वॉर्डात कंटेनमेंट झोन
Next articleनेत्यांच्या श्रेयवादात लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांचे हाल:सोशल डिस्टंसिंगचा फज्जा