सरपंच संभाजी घारे यांच्या मध्यस्थीने दहा वर्षांनंतर म्हसाडे वस्ती ते कॅनॉल पर्यंतचा शेत रस्ता घेणार मोकळा श्वास

राजगुरूनगर- दावडी येथील म्हसाडे वस्ती ते कॅनॉल रस्ता आठ ते दहा वर्षा पासून बंद होता.रस्ता बंद असल्याने खूप नुकसान शेतकऱ्यांच होत असत व लोकवस्ती असल्याने जाणे येणे बंद झाले होते.शेतकऱ्यांना शेतीमाल डोक्यावर बाहेर काढावा लागत असे व त्यामुळं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असत या रस्त्यासाठी अनेक वादविवाद ,पोलीस स्टेशन पर्यंत वाद गेले होते. या रस्त्याची स्थळ पाहणी तहसीलदार साहेब यांनी केली होती.

हा वाद लक्षात घेता सरपंच संभाजी घारे यांच्यासह पोलीस पाटील आत्माराम डुंबरे पाटील, उपसरपंच राहुल कदम, ग्रामपंचायत सदस्या पुष्पा होरे,मा उपसरपंच भाऊसो होरे, ग्रामपंचायत सदस्य अनिल नेटके,उद्योजक मारुती बोत्रे यांच्या मध्यस्थीने वस्ती वरील सर्व भाऊबंदकी एक करून ह्या रस्त्याचा वाद मिटवल्यामूळे शेतकरी वर्ग आनंदी झाला असून.हा रस्ता खुला झाल्याने ३५० एकर जमीन व २०० शेतकऱ्यांच्या शेतीमालाची दळण वळण सोयीस्कर झाली आहे. या रस्त्यासाठी ग्रामपंचायत निधी उपलब्ध करून देण्यात आला.

यावेळी उपस्थित मा.सभापती नवनाथ होले, शिक्षक सभापती रमेश होरे,रामदास म्हसाडे, गोरक्ष म्हसाडे ,सुनील म्हसाडे,प्रमोद म्हसाडे,मारुती म्हसाडे,सचिन म्हसाडे,किरण म्हसाडे उपस्थित होते.

Previous articleखेड तालुक्यातील पोलीस पाटलांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दोन लाख रूपयांची मदत
Next articleवारूळवाडी मध्ये दोन वॉर्डात कंटेनमेंट झोन