खेड तालुक्यातील पोलीस पाटलांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दोन लाख रूपयांची मदत

वाढदिवसाच्या जाहिरात

 राजगुरूनगर- जगभरात करोनानी थैमान घातलं आहे यासाठी शासन आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे.यासाठी मदतीचा एक हात यामध्ये महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत खेड तालुक्यातील १८० पोलीस पाटील यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये दोन लाख रुपये जमा करण्याचे पत्र देण्यात आले आहे.करोनाच्या लढ्यात खेड तालुक्यातील पोलिस पाटलांनी खारीचा वाटा उचलला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदीं व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत पाटलांनी निधी जमा केला आहे.हा निधी उपविभागीय अधिकारी अनिल लांभते,खेड पोलीस स्टेशनचे निरक्षक सतीश गुरव यांच्या कडे सुपूर्त केला आहे.

 यावेळी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, पुणे जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष साहेबराव राळे,खेड तालुका पोलीस पाटिल संघटना उपाध्यक्ष आत्माराम डुंबरे,महिला अध्यक्ष तृप्ती मांडेकर पप्पूकाका राक्षे,निलेश दोंडकर,सचिन वाळुंज, दादाभाऊ खंडागळे,कार्याध्यक्ष अमोल पाचपुते व तालुक्यातील पोलीस पाटिल उपस्थित होते.

Previous articleराजगुरूनगर मध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने निषेध
Next articleसरपंच संभाजी घारे यांच्या मध्यस्थीने दहा वर्षांनंतर म्हसाडे वस्ती ते कॅनॉल पर्यंतचा शेत रस्ता घेणार मोकळा श्वास