राजगुरूनगर मध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने निषेध

राजगुरुनगर- मराठा आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने या निषेधार्थ   राजगुरूनगर शहरात सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने निषेध करण्यात आला.

 केंद्र आणि राज्य सरकारने राजकीय टोलवाटोलवी करू नये. समाजाची करमणूक न करता समाजाचा प्रश्न मार्गी लावावा. मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी दोन्ही सरकारने भूमिका घ्यावी- वामन बाजारे

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे म्हणाले, आरक्षणासाठी घटनेत बदल करावा केंद्राने ही जबादारी घ्यावी सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाबाबत भूमिका घ्यावी. करोनाची परिस्थिती लक्षात घेऊन आज मोठे आंदोलन केले नाही. आम्ही शांत बसणार नाही. आरक्षण आमच्या हक्काचे आहे.मराठा बांधव निश्चित यासाठी आक्रमक भूमिका घेतील .

 याप्रसंगी मोर्चाचे समन्वयक अंकुश राक्षे, शंकर राक्षे, वामन बाजारे, अॅड अनिल राक्षे, माणिक होरे, अॅड. शुभम गाडगे, मंगेश सावंत, सत्यवान शिंदे, दीपक थिगळे, संदेश पाचारणे, डॉ वामन गव्हाणे, चेतन शेटे, रणधीर सुर्वे उपस्थित होते.

Previous articleखेड तालुक्यात तरूणांच्या पुढाकाराने  प्लाझ्मादानाची चळवळ
Next articleखेड तालुक्यातील पोलीस पाटलांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दोन लाख रूपयांची मदत