कासुर्डी येथे ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने रक्तदान शिबिर संपन्न

दिनेश पवार,दौंड

कासुर्डी ग्रामस्थ आणि कोविड हेल्पसेंटर दौंड तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने, विठ्ठल रुक्मिणी मंदिर कासुर्डी गावठाण येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,तरुण वर्गासह ग्रामस्थांनी या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने 76 रक्तदात्यांनी रक्तदान केले,कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत आहे, तसेच या परिस्थितीत रक्ताची मागणी देखील वाढत आहे, या परिस्थितीवरती उपाययोजना म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी रक्तदात्यांना आयोजकांच्या वतिने थंड पाण्याचा जार भेटवस्तू म्हणून देण्यात आला.आणी सोबत सॕनिटायझर देण्यात आले सॕनिटायझर सौजन्य देऊळगाव गाडा मा.सरपंच डी.डी.बारवकर यांनी दिले.संपूर्ण कार्यक्रम अल्पोपहार सौजन्य मा.सरपंच पांडुरंग आखाडे,ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय आखाडे,मा.चेअरमन सोपान गायकवाड यांनी दिले तर कार्यक्रमास साईनाथ मंडप कासुर्डी चे उद्योजक लक्ष्मण खेनट यांनी विशेष सहकार्य केले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा महासंघाचे जिल्हा सचिव मयुर सोळसकर,अविनाश आखाडे,राहुल आखाडे, माजी ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र सोनवणे,संतोष आखाडे,सुरज आखाडे,संदिप सोनवणे,प्रमोद गायकवाड,संतोष सर्जेराव आखाडे,कालिदास भिसे,पांडुरंग वीर,अतुल आखाडे, संदेश खेनट यांचे सहकार्य लाभले

Previous articleआयपीएल २१ रद्द नाही ; आयपीएलच्या अध्यक्षांची सर्वात मोठी माहिती
Next articleवाघोलीच्या सोसायटीमधील लसीकणावरुन राष्ट्रवादीचे खासदार आणि शिवसेना पुणे जिल्हा प्रमुखांच्या कार्येकर्तांत शीत युध्द