जनावरांची चोरी करणारी अट्टल टोळी जेरबंद

अमोल भोसले ,उरुळी कांचन

लॉकडाऊनचे अनुषंगाने पुणे सोलापुर हायवेवर पेट्रोलिंग करीत असताना यवत पोलिस स्टेशन हद्दीतील बोरी पारधी येथील शेळ्यांची चोरी करणारे काही जण चौफुला सुपा रोडवरील कॅनॉलवर असल्याची माहिती त्याांना मिळाली.सदर ठिकाणी LCB ने सापळा लावून दोन जणांना ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारले असता त्यांनी १) भरत शिवाजी जाधव (वय २७ वर्ष रा.गडदे वस्ती चौफुला ता.दौंड) २) अमोल शिरशु माने (वय २२ वर्ष रा.लोणी भापकर ता.बारामती) असे सांगितले त्यांचेकडे अधिक चौकशी केली त्यांनी १) महादेव तानाजी जाधव २)हनुमंत रमेश जाधव ३) अनिल अशोक माने ४)अंकुश शिवाजी जाधव ५) राहुल जालिंदर माने सर्व (रा.केडगाव टोलनाका ता.दौंंड) ६) रामदास माने (रा.मुरटी ता.बारामती) ७) अविनाश संजय ठोंबरे (रा.लोणी भापकर ता.बारामती ) यांच्या मदतीने खालील गुन्हे केले असल्याचे कबुल केले आहे.

यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.१२६/२०२१ भा.द.वि ३७९,यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.२२६/२०२१ भा.द.वि ३७९,यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.२४६/२०२१ भा.द.वि ३७९,बारामती तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं.२३/२०१८भा.द.वि ३७९, सासवड पोलीस स्टेशन गु.र.नं.११८/२०२१ भा.द.वि ३७९,३४,यवत पोलीस स्टेशन गु.र.नं.३६४/२०२१ भा.द.वि ३७९ यातील आरोपी भरत शिवाजी जाधव (वय २७ वर्ष रा.गडदे वस्ती चौफुला ता.दौंड) , अमोल शिरशु माने (वय २२ वर्ष रा.लोणी भापकर ता.बारामती) याच्या ताब्यातून वर नमूद गुन्हे करण्यासाठी वापरण्यात आलेल्या 2 बोलेरो पिकअप MH-42-M-8328 MH-42-0368 व एक बिगर नंबर काळया रंगाची ऍक्टिव्ह असा एकूण ११,००,०००/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करणात आला आहे.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस बारामती अधिक्षक मिलिंद मोहिते तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई शिवाजी ननवरे, अमोल गोरे, पो हवा अनिल काळे, रविराज कोकरे, हनुमंत पासलकर, पो ना विजय कांचन, पो कॉ अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, धीरज, जाधव, अक्षय जावळे, दगडू वीरकर यांचे पथकाने केली आहे.

Previous articleबेल्हे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गोरक्षनाथ वाघ यांची निवड
Next articleसावरदरी ग्रामपंचायतीने कंपन्यामध्ये जाऊन घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा