रेटवडीत महाराष्ट्र दिनानिमित्त जनजागृती

राजगुरूनगर- रेटवडी (ता.खेड)येथे गावात कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रेटवडी गावातील सर्व वाड्यावस्त्यांवर चारचाकी वाहनावर साऊंड सिस्टीम लावून खेड पोलीस स्टेशन, रेटवडी ग्रामपंचायत व पोलीस पाटील यांच्या मार्फत जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले , सगळयांना कोरोना रोगाचे गांभीर्य समजून सांगण्यात आले , त्या रोगापासून सुटका होण्यासाठी व बचाव करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.

तसेच शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याची विनंती ग्रामस्थांना करण्यात आली , विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर तसेच चारचाकी गाड्या मध्ये 3 पेक्षा जास्त लोक असतील तर त्यांच्यावर कारवाई करून दंड आकारण्यात आला.

गावातील सर्व दुकाने सकाळी 7 ते 11 यावेळेतच उघडण्याचे आव्हान दुकानदारांना करण्यात आले , पुढील काळात कोणी शासकीय नियमांचे पालन करत नसल्याचे आढळल्यास त्यावर आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगण्यात आले.

यावेळी खेड पोलीस स्टेशन चे बिट अंमलदार श्री घोडे साहेब , पोलीस नाईक श्री अवघडे साहेब , पोलीस हवालदार,श्री साबळे साहेब रेटवडी गावचे पोलीस पाटील,श्री उत्तमराव खंडागळे , ग्रामपंचायत चे मा उपसरपंच श्री नवनाथ पवार ,ग्रामपंचायत सदस्य श्री दिलीप डुबे ,श्री किरण पवार , श्री अतुल थिटे , श्री सुभाष हिंगे *ग्रामपंचायत कर्मचारी, श्री नवनाथ गिरीगोसावी ,योगेश बोऱ्हाडे हे उपस्थित होते

Previous articleद्वारका वृद्धाश्रमातील वृद्धांचे लसीकरण
Next articleहोळकर राजघराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर व दिग्विजयसिंह पारेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत वन्यजिवांसाठी केली पाण्याची सोय