डॉ.मणिभाई देसाई यांच्या जयंती निमित्त पोलीस कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मास्क – सॅनिटायझरचे वाटप

अमोल भोसले,उरुळी कांचन

डॉ.मणिभाई देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बाएफने पशुसंवर्धनाच्या कार्यक्रमातून संकरित गायींची संकल्पना ग्रामीण भागात प्रथमच रुजविली असे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक सदाशिव गायकवाड यांनी व्यक्त केले. डॉ. मणीभाई देसाई यांच्या जयंतीनिमित्त डॉ. मणीभाई देसाई कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यामधील कर्मचारी व येथील ग्रामपंचायत कर्मचारी यांना मास्क – सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

यावेळी डॉ. मणीभाई देसाई कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय कांचन, उपाध्यक्ष सुनिल गोते, सचिव रोहिदास कोतवाल, खजिनदार सोमनाथ कोतवाल, जेष्ठ विश्वस्त संजय टिळेकर, सहकार्याध्यक्ष सागर कांचन, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक सुनिल जगताप, गोविंद तापकीर, सोमनाथ बगाडे आदी उपस्थित होते.

डॉ.मणीभाई देसाई पतसंस्थांच्या येथील डॉ. मणिभाई देसाई यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पुजा करण्यात आली. निसर्गोपचार आश्रम येथेही डॉ. मणिभाई देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले

Previous articleदावडी ग्रामपंचायतीच्या वतीने अपंगांना धनादेश वाटप
Next articleउरुळी कांचन – प्राथमिक आरोग्य केंंद्रात शव विच्छेदनाला मंजूरी