सावरदरी येथील जुन्या पिढीतील लक्ष्मीबाई साकोरे यांचे वृद्धापकाळाने निधन

चाकण : औद्योगिक नगरी सावरदरी (ता. खेड) येथील जुन्या पिढीतील लक्ष्मीबाई ऊर्फ पार्वतीबाई आनंदराव साकोरे (वय ८०) यांचे रविवार (दि.२५) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.

दशक्रिया विधी
गुरूवार (दि.२९) रोजी सकाळी ८ वाजता स्थळ-मु.पो.सावरदरी,ता.खेड,जि.पुणे

त्यांच्या पश्चात तीन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त एसटी कर्मचारी ज्ञानेश्वर साकोरे, उद्योजक, प्रगतिशील शेतकरी तुकाराम साकोरे, बाळासाहेब साकोरे हे त्यांचे पुत्र होत. तसेच सावरदरी गावचे पोलिस पाटील राहुल साकोरे हे त्यांचे नातू होत.

Previous articleविक्रांत पतसंस्थेतर्फे आशा वर्कर्स आणि रुग्णवाहिका चालकांसाठी कोरोना विमा कवच
Next articleदावडी ग्रामपंचायतीच्या वतीने अपंगांना धनादेश वाटप