चाकण- तळेगाव चौकात भीषण अपघात; तीन युवकांचा जागीच मृत्यू

चाकण : येथील तळेगाव चौकात कंटेनर ,सिलेंरो कार व स्कॉर्पिओ या तीन वाहनांच्या झालेल्या भीषण अपघातात सिलेंरो कार मधील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज ( दि.२६) रोजी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास झाला.

प्रफुल्ल संपत सोनवणे ( वय.२७ वर्षे,रा.वाकी बुद्रुक ),अक्षय मारुती सोनवणे ( वय.२३ वर्षे,रा.वाकी बुद्रुक ),अविनाश रोहिदास अरगडे ( वय.२८ वर्षे,रा.कडूस,ता.खेड ) अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत.

या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर बाजूकडून तळेगावकडे जाणाऱ्या  कंटेनरची राजगुरूनगर बाजूकडे भरधाव जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीला धडक बसल्याने स्कॉर्पिओ चालकाचा ताबा सुटला आणि सिग्नलला उभ्या असलेल्या सिलेंरो कारला भरधाव स्कॉर्पिओची धडक बसली,या भीषण अपघातात तीन युवकांचा जागेवरच मृत्यू झाला.तर स्कॉर्पिओ मधील दोन जण जखमी झाले आहेत.

Previous articleदेऊळगाव राजे येथे रक्तदान शिबिर संपन्न
Next articleविक्रांत पतसंस्थेतर्फे आशा वर्कर्स आणि रुग्णवाहिका चालकांसाठी कोरोना विमा कवच