जुन्नर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या पोहचली १६७ वर; आज सापडले १९ कोरोणा बाधित रुग्ण

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यामध्ये आज एकूण १९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.

नारायणगाव – वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आज आलेल्या अहवालानुसार आज दिनांक १३ जुलै रोजी नारायणगाव येथे ४ जणांचा कोरोणा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच वारूळवाडी येथे एक, ओझर येथे ०२, हिवरे बुद्रूक येथे ०२ औरंगपूर येथे ०३ जणांचा अहवाल पाँझीटिव्ह आला असून आज तालुक्यामध्ये एकूण तेवीस जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश गोडे व वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी दिली.

आज अखेर जुन्नर तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या एकूण १६७ एवढी झाली आहे. आजपर्यंत ७३ रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी पाठवण्यात आले आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाला असून एकूण ९१ अँक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. अशी माहिती गटविकास अधिकारी हेमंत गरिबे व आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

काही दिवसांपूर्वी नारायणगाव येथे निष्पन्न झालेल्या एका होलसेल मेडिकल वितरकाकडील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णा च्या सानिध्यात आलेल्या सुमारे दहा जणांचा कोरोना चाचणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.

या घटनेमुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज असून दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील व सरपंच योगेश पाटे यांनी केले.

Previous articleकरोनाचे एक लाखापर्यंतचे बिल जिल्हा परिषद भरणार
Next articleजुन्नर तालुक्यातील रुग्णांची संख्या पोहचली १८४ वर