आमदार अतुल बेनके यांचे निवासस्थानी धुडगूस घालून सुरक्षारक्षकाला मारहाण करणाऱ्या दोन आरोपींना अटक

नारायणगाव (किरण वाजगे)

आमदार अतुल बेनके यांच्या निवासस्थानी धुडगूस घालून सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला मुख्य आरोपी कपिल वासुदेव कानसकर यास नारायणगाव पोलिसांनी शनिवार दि.२४ एप्रिल रोजी अटक केली आहे.अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांच्या बंगल्यावर काम करत असलेल्या सुरक्षारक्षक खंडेराव पिराजी पानसरे (रा. नारायणगाव, वय ३५) यांना २१ एप्रिल २०१९ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कपिल कानसकर व त्याच्या साथीदारांनी मारहाण केली होती या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम ३९५ नुसार नारायणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल आहे. ह्या गुन्ह्यातील अन्य आरोपी प्रसाद दशरथ पाटे याला देखील अटक करण्यात आली असून एक आरोपी अल्पवयीन आहे. तर अन्य दोन आरोपी फरार आहे.

या घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख व उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे हे करीत आहेत.

Previous articleजेष्ठ निराधार नागरिकांना दौंड पोलिसांची मदत
Next articleवारुळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना धमकी दिल्याने एकावर” नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल