जेष्ठ निराधार नागरिकांना दौंड पोलिसांची मदत

दिनेश पवार,दौंड

कोरोना च्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे, यामुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे, अशातच जेष्ठ निराधार नागरिकांना तर कोणीच नसल्याने त्यांना कोठून तरी मदत होणे गरजेचे असताना दौंड पोलीस स्टेशनचे परिक्षाविधींन पोलीस उपअधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली दौंड तालुक्यातील निराधार जेष्ठ नागरिकांच्या घरी जावून त्यांना त्यांना विषेश मदत करण्यात येत आहे.

पोलीस एखाद्याचा शोध घेत थेट त्याच्यापर्यंत पोहोचले म्हणजे तो एखाद्या प्रकरणात सापडला असाच विचार केला जातो.परंतु दौंड पोलिसांनी मदती जेष्ठ निराधार नागरिकांचा शोध सुरू केला आह.कोरोना व लाॅकडाऊनच्या काळात आरोग्याची समस्या निर्माण होऊ नये तसेच उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून जेष्ठ निराधार नागरीकांना पोलीसांची मदत हा अभिनव उपक्रम दौंड पोलीसांनी सुरू केला आहे. या माध्यमातून दौंड येथील परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ यांच्या वतीने जेष्ठ निराधारांना अन्नधान्यांच्या किटचे वाटप केले जात आहे. त्याचबरोबर सॅनिटायझर व मास्कचे वाटप सुरू केले आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊनचा पर्याय निवडला आहे.

या काळात ज्यांना कोणाचाच आधार नाही अशा जेष्ठ निराधार नागरीकांसाठी पोलीसांनी पुढाकार घेऊन त्यांना लागणारी सर्व मदत करण्याची अभिनव संकल्पना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार दौंड पोलीसांनी मदतीचे कार्य सुरू केले आहे. पोलीस पाटलांच्या सहकार्यांने दौंड तालुक्यातील जेष्ठ निराधार महिला व पुरूषांची माहिती संकलित केली जात आहे.

या माहितीच्या आधारे दौंड पोलीसांचे पथक थेट त्याच्यापर्यंत जाऊन त्यांच्या आरोग्याची विचारपूस करीत आहे. त्यांचे अडीअडचणी जाणून घेत आहेत. तसेच कोरोना (टेेस्ट) तपासणी, लस, औषधोपचार यासंदर्भातील समज गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

त्याचबरोबर अन्नधान्याचे किटचे वाटप केले जात आहे. यामध्ये आत्तापर्यंत २५ जेष्ठ नागरिकांपर्यंत हि मदत पोहच झाली आहे. अजून माहिती मिळेल तशी मदत केली जाणार आहे. या उपक्रमासाठी दौंड पोलीस ठाण्यातील सर्वच पोलीस स्टाफचे सहकार्य लाभत आहे. अशी माहिती परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ यांनी दिली.

Previous articleवृद्ध आई-वडिलांना घरातून काढले बाहेर ; मुलासह सुनेवर गुन्हा दाखल
Next articleआमदार अतुल बेनके यांचे निवासस्थानी धुडगूस घालून सुरक्षारक्षकाला मारहाण करणाऱ्या दोन आरोपींना अटक