वृद्ध आई-वडिलांना घरातून काढले बाहेर ; मुलासह सुनेवर गुन्हा दाखल

प्रमोद दांगट , निरगुडसर

निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे
वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ न करता त्यांना राहत्या घरातून बाहेर काढल्याप्रकरणी मुलगा आणि सुनेविरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धर्मराज यशवंत वळसे पाटील (वय ६६) आणि त्यांची पत्नी मीना असे या वृद्ध आई-वडिलांचे नाव आहे. त्यांना त्यांचा मुलगा किरण आणि सून सुप्रिया हे सन २०१९ पासून सांभाळत नाहीत तसेच मुलाने वयोवृद्ध आई-वडिलांना गुरुवारी (दि. २२) मी तुम्हाला सांभाळनार नाही काय करायचं ते करा असे म्हणत घराबाहेर काढले आहे. याप्रकरणी मुलगा किरण धर्मराज वळसे व सून सुप्रिया किरण वळसे यांच्याविरोधात धर्मराज वळसे पाटील यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आई-वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ चे कलम २४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जवान नीलेश खैरे करीत आहेत.

Previous articleमांडूळाची तस्करी केल्याप्रकरणी दोघांना अटक
Next articleजेष्ठ निराधार नागरिकांना दौंड पोलिसांची मदत